Sarkari Naukri : डीआरडीओसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी, त्वरा करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 01:53 PM2020-11-12T13:53:09+5:302020-11-12T13:54:39+5:30
डीआरडीओ आणि इंडियन आर्मीसह काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात.
मुंबई - सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी डीआरडीओ आणि इंडियन आर्मीसह काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात.
DRDO 2020 -
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी युवकांसाठी आली आहे. DRDO ने अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी वॉक-इन इंटरव्ह्यूच्या माध्यमाने निवड होणार आहे. यासाठी 13 नोव्हेंबरला सकाळपासून मुलाखतींना सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. याशिवाय नोटिफिकेशन लिंकवरही क्लिक करू शकता.
भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी -
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 02 नोव्हेंबर, 2020 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मेरीटच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवार साऊथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 10वी पास उमेदवार या पदावर अर्ज करू शकतात.
Indian Army : पदवीधर उमेदवारांनी आजच करावा अर्ज -
भारतीय लष्करात (Indian Army) सामील होण्याची चांगली संधी आहे. भारतीय लष्कराने अभियांत्रिका पदविधारकांसाठी, शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्सअंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी भरती काढली आहे. अर्जकरण्याची आज अखेरची तारीख आहे. यामुळे इच्छुकांना आजच्या आजच अर्ज करावा लागणार आहे. 20 ते 27 वर्ष वयोगटातील युवक यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक अमेदवार joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग -
उत्तर प्रदेशातही अनेक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. रिजनल इंस्पेक्टर पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी 21 वर्षांच्या वरील इच्छुक उमेदवारच अर्ज करू शकतात. येथे नोकरी मिळाल्यास चांगल्या पगाराबरोबरच चांगल्या सुविधांचाही लाभ होईल. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी uppsc.up.nic.in. या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.