DRDO scientist arrested: मोठी बातमी! पुणे डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 09:44 PM2023-05-04T21:44:15+5:302023-05-04T21:44:40+5:30
Pune DRDO scientist arrested : भारताशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे.
Pune DRDO scientist arrested : पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्र एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. शास्त्रज्ञाने हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय केला जात आहे.
Maharashtra | A DRDO scientist, who was working in one of the facilities of DRDO in Pune, has been arrested by ATS on the charges of espionage. He was found to have had contact with the operatives of Pakistan's Intelligence Agency through social media via WhatsApp messages, voice…
— ANI (@ANI) May 4, 2023
संबंधित व्यक्ती डीआरडीओच्या पुण्यातील कार्यालयातून सोशल मिडियाच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हशी संपर्कात असल्याची माहिती आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्याच्या निवृत्तीला 6 महिने राहिले असताना तो हनीट्रॅपमध्ये फसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलच्या माध्यमातून ते पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे. आपल्या पदावर राहून त्यांनी संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. या प्रकरणी आरोपी शास्त्रज्ञावर शासकीय गुपीते पुरवल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.