'सपनो की रंगोली’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगविली स्वप्ने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 03:28 PM2016-09-10T15:28:27+5:302016-09-10T15:28:27+5:30

साक्षरता दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘सपनो की रंगोली’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढे काय व्हायचे आहे याचे वास्तव चित्रण चित्राच्या माध्यमातून मांडले.

'Dream ki Rangoli' competition among students, dreams! | 'सपनो की रंगोली’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगविली स्वप्ने!

'सपनो की रंगोली’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगविली स्वप्ने!

Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १० -  साक्षरता दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘सपनो की रंगोली’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढे काय व्हायचे आहे याचे वास्तव चित्रण चित्राच्या माध्यमातून अप्रतिम स्वरुपात रेखाटले. तालुक्यातील धुमका येथील स्व. नामदेवराव राजगुरु विद्यालय व उकळीपेन येथील  हनुमान विद्यालयात ८ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा घेण्यात आली. सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या धर्मा लाईफ या संस्थेच्या वतीने या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. 
    साक्षरता दिनाचे औचित्य साधून संस्थेने देशातील जवळपास दहा राज्यांमधील २०० च्या वर जिल्हयांमधील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  धुमका येथील शाळेमध्ये आयोजित या स्पर्धेत १८८ तर  उकळीपेन शाळेतील ३६४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहात भाग घेवून आपल्या भविष्यकालीन स्वप्नांची मुतीर्मंत व बोलकी चित्रे रेखाटून आपल्या चित्रकलेचा अविष्कार घडविला.  मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धर्मा लाईफ संस्था देशपातळीवर कार्य करत आहे. या कायार्चाच एक भाग म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलीे.  या स्पधेचे आयोजन धर्मा लाईफचे जिल्हा संयोजक गजानन धामणे यांनी केले होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी  सुरेश राजगुरु, नंदु धुळे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 
 
 
 
 

Web Title: 'Dream ki Rangoli' competition among students, dreams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.