वैद्यकीय परीक्षांसाठीही ड्रेसकोड, धार्मिक पेहरावाला सवलत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 01:45 PM2018-11-19T13:45:09+5:302018-11-19T13:49:28+5:30

नीट प्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाºया विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे.

Dress code for religious exams, religious allowances discount | वैद्यकीय परीक्षांसाठीही ड्रेसकोड, धार्मिक पेहरावाला सवलत 

वैद्यकीय परीक्षांसाठीही ड्रेसकोड, धार्मिक पेहरावाला सवलत 

Next
ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठ : येत्या परीक्षेपासून अंमलबजावणी अर्ध्या बाहीचा व फिक्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट, चप्पल असा ड्रेसकोडघड्याळे, ब्लुटूथ डिव्हाइस अशा विविध माध्यमातून विद्यार्थी कॉपी करण्याचे प्रकार

पुणे : नीट प्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाºया विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना अर्ध्या बाहीचा व फिक्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट, चप्पल असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. यातून धार्मिक व परंपरेशी संबंधित पेहरावाला सवलत देण्यात आली आहे. दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी हा ड्रेसकोड लागु होणार आहे. 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)ने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रेसकोड निश्चित केलेला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. हीच पध्दत आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वीकारली आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठाने अशाप्रकारे ड्रेसकोड ठरविला आहे.विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या परीक्षांपासून ड्रेसकोडच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
याविषयी माहिती देताना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, विद्यापीठाच्या परीक्षा घेताना विविध केंद्रांवर अनेक अडचणी येतात. घड्याळे, ब्लुटूथ डिव्हाइस अशा विविध माध्यमातून विद्यार्थी कॉपी करतात. त्यामुळे तज्ज्ञांनी याबाबतची नियमावली तयार केली. त्यासाठी नीटची पध्दत अवलंबण्यात आली आहे. त्यानुसार पेहरावाबाबत नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणी येत्या परीक्षेपासून सुरू केली जाणार आहे. त्यानंतर होणाºया प्रत्येक परीक्षेला हीच नियमावली असेल. 
-----------------
असा असेल ड्रेसकोड
- अर्ध्या बाहीचे, फिक्या रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट. मुलींना यासह साडी किंवा सलवार कमीजही चालेल.
- शर्टला छोटे बटन असावे. नक्षीदार बटन नसावे. 
- अंगठी, गळ्यातील साखळी यांसह कुठल्याही प्रकारचे दागिने (मंगळसुत्र वगळून) घातला येणार नाही. 
- घड्याळ, मोबाईल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नसावे.
- अप्रन, टोपी, गॉगल, पर्स, हार, चेन, पीन, हँड बॅग आदी वस्तु वापरता येणार नाहीत.
- पायात चप्पल/स्लीपर असावी. बुट नसावेत.

Web Title: Dress code for religious exams, religious allowances discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.