हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 01:53 PM2017-07-31T13:53:05+5:302017-07-31T17:51:13+5:30

हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे.

Drink-driving cases down by 40% after highway liquor ban | हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घट

हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घट

googlenewsNext
ठळक मुद्दे हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे.1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला आहे

मुंबई, दि. 31- हायवेपासून 500 मीटरपर्यंत दारूबंदी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे परिणाम दिसायला लागले आहेत. हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे. 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला आहे.  राज्य पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार हायवेवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही 21 टक्क्यांनी घटली आहे.

'हायवेवरील दारूबंदीचाच हा परिणाम आहे, असा आताच निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. पण हायेवरील दारूबंदीचा हा सकारात्मक परिणाम झाला आहे. यासाठी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. हॉटेलांमध्ये अल्को-बुथ्स उभारून गाडी चालवण्याआधी चालकांची रक्तातली अल्कोहोल पातळी पाहण्याच्या मोहिमेचाही फायदा झाला आहे, असं वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. 

राज्य पोलीस विभागातील अधिकारी ज्यांनी रस्त्यावरील अपघात आणि दारू पिऊन गाडी चालवणं यासगळ्याचा अभ्यास केला आहे, त्यांच्या माहितीनुसार अपघातांची आणि जखमींची संख्या घटणं हे फक्त दारूबंदीमुळे झालेलं नाही. 'अपघातांच्या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केलं तर घटलेली संख्या राज्याच्या शहरातली तसंच निमशहरातली आहे. तिथे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कमी आहेत. त्यामुळे दारुबंदीचाच हा परिणाम आहे, असं म्हणता येणार नाही. शिवाय या मार्गांवरील ढाब्यांवर अजूनही दारू मिळते,' असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

उत्पादन शुल्क विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार, हायवेवरील दारूबंदीमुळे बेकायदा दारू पुरवणाऱ्यांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या तर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांची संख्या तसंच अपघातांची संख्या आणखी घटेल.
शासनाच्यावतीने १ एप्रिलपासून हायवेवर असलेल्या ५०० मीटरच्या आतमधील रेस्टॉरंट, ढाबा, बीअर बार, बीअर शॉप यांना सील ठोकण्यात आलं आहे.  


 

Web Title: Drink-driving cases down by 40% after highway liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.