मद्य पिण्याचे वय एकच करा
By admin | Published: April 9, 2017 03:11 AM2017-04-09T03:11:42+5:302017-04-09T03:11:42+5:30
देशभरात केवळ महाराष्ट्रात मद्य पिण्याचे वयात तफावत आहे. त्यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जाते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याविषयी, इंडियन मेडिकल
मुंबई : देशभरात केवळ महाराष्ट्रात मद्य पिण्याचे वयात तफावत आहे. त्यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जाते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युथ विंग अध्यक्ष असणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयी लेखी निवेदन देऊन त्याद्वारे मद्य पिण्याचे वय एकच असावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात वाइनसाठी १८ वर्षे, बीअरसाठी २१ वर्षे आणि मद्यसेवनाकरिता २५ वर्षे अशी तरतूद आहे. मात्र हे वयाचे निकष कोणत्याही विचाराविना लावण्यात आल्याचे डॉ. मुंदडा यांचे म्हणणे आहे. वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण बीअरपेक्षा अधिक असते. मात्र कायद्यातील तरतुदी या मद्यसेवनाला प्रोत्साहन देत आहेत, या गंभीर विरोधाभासाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे. शिवाय, सर्व प्रकारच्या मद्यसेवनाकरिता २५ हेच वय असावे; आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जावी याकरिता उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल करण्यात आली असून, लवकरच यावर सुनावणी होईल.
डॉ. मुंदडा यांनी सांगितले की, मद्यसेवनाकरिता असलेले २५ वर्षे वयाचे बंधन महाराष्ट्रात कुठेही पाळले जात नाही. सर्रासपणे सर्वच ठिकाणी याविषयी कायदे धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे सध्याच्या कायद्याचा काहीच उपयोग नाही, त्यात महत्त्वाच्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लेखी निवेदन, याचिका याप्रमाणेच लवकरच या विषयावर लोकसहभाग घेऊन जनजागृतीपर अभियान राबविण्याचा मानसही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत वाइन पिण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याची माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली.(प्रतिनिधी)
२५ वर्षे वयाचे बंधन पाळले जात नाही
- मद्यसेवनाकरिता असलेले २५ वर्षे वयाचे बंधन महाराष्ट्रात कुठेही पाळले जात नाही. सर्रासपणे सर्वच ठिकाणी याविषयी कायदे धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे सध्याच्या कायद्याचा काहीच उपयोग नाही, त्यात महत्त्वाच्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे लेखी निवेदन, याचिका याप्रमाणेच लवकरच या विषयावर लोकसहभाग घेऊन जनजागृतीपर अभियान राबविण्याचा मानसही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत वाइन पिण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याची माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली.