"किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय"; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:31 PM2022-07-25T14:31:32+5:302022-07-25T14:35:34+5:30

Sambhaji Raje : पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Drinking alcohol in the fort is highly reprehensible says Sambhaji Raje Over Panhala viral video | "किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय"; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...

"किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय"; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...

Next

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी रंगल्याची घटना समोर आली. या पार्टीचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यानs किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"कुठल्याही किल्ल्यावर दारू पिणं हे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी एका सिस्टीमची गरज आहे" असं म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात या दोघांमध्ये गळाभेट झाली. राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते. "गड-किल्ल्यांचे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. कुठल्याही किल्ल्यावर दारू पिणं हे निंदनीय आहे. यासाठी एका सिस्टीमची गरज आहे. मी उद्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्या चर्चेनंतर पुढील रुपरेषा ठरेल" असं संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्ल्यावरील व्हिडीओबाबत म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी पन्हाळा गडाची तटबंदी काही बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. त्यामुळे पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली होती. 

महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याची तटबंदी काही बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. संततधार पावसाने पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेल्या ऐतिहासिक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. मागीलवर्षीही याच जागेजवळ भिंतीचा काही भाग कोसळला होता, मात्र निधीअभावी दुरुस्तीची कामे झाली नाहीत. 

महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्यानं पडझड होत आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
 

Web Title: Drinking alcohol in the fort is highly reprehensible says Sambhaji Raje Over Panhala viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.