मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:17 AM2017-08-05T11:17:51+5:302017-08-05T11:18:40+5:30

सोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत.

Drinking alcohol license now online! | मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन !

मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन !

googlenewsNext
ठळक मुद्दे १३ प्रकारच्या विविध सेवा आता घरबसल्या मिळणार परवाने तातडीने उपलब्ध होणारसर्वच खात्यांमध्ये ‘स्मार्ट वर्क’ करण्यासाठी स्पर्धा


महेश कुलकर्णी : आॅनलाइन लोकमत
सोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत.
प्रशासनाच्या सर्वच खात्यांमध्ये ‘स्मार्ट वर्क’ करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून, फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसणारे राज्य उत्पादन शुल्क खातेही या स्पर्धेत मागे राहिलेले नाही. १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपान आणि मद्यविक्रीच्या परवान्यासह १३ आॅनलाईन सेवांना सुरुवात केलेली आहे. 
सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह राज्यात मद्यपान करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी परवाना लागत असतो. असे परवाने एक दिवसापासून, वार्षिक आणि आजीवन या तीन प्रकारात उपलब्ध असतात. उत्पादन शुल्क खाते आणि मद्यविक्रीच्या दुकानात हे परवाने उपलब्ध असतात. विशेषत: ३१ डिसेंबरला या परवान्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. असा परवाना मिळविण्यासाठी इच्छुकांना उत्पादन शुल्क खात्यात चकरा मारण्याची गरज राहिली नाही.यासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार नाही. ठराविक शुल्काची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास हे परवाने तातडीने उपलब्ध होणार आहेत. 
याबरोबरच उत्पादन शुल्क खात्याकडे परवानगीसाठी येणारे वाईन शॉप (एफएल-२), परमिट रुम (एफएल-३), देशी दारू (सीएल-३), बीअर शॉपी (एफएल/बीआर-२) या महत्त्वाच्या परवान्यांसाठी आता उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. मुंबईस्थित महाआॅनलाईन लि. या कंपनीद्वारे ही राज्यभरातील सर्व जिल्ह्यात ही सेवा पुरविण्यात येणार असून ६६६.ी७ू्र२ी२ी१५्रूी२.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल  या वेबसाईटवर ही सर्व माहिती भरता येणार आहे.
------------------------------
प्रशिक्षण पूर्ण
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आॅनलाईन अर्ज यासंबंधीचे प्रशिक्षण मुंबई येथील महाआॅनलाईनचे शशिकांत इगवले यांनी दिले. या प्रशिक्षणात उत्पादन शुल्क खात्याकडून दिल्या जाणाºया सेवांचे अर्ज कसे भरावेत तसेच ते कसे स्वीकारावेत यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि मद्यविक्रेते उपस्थित होते.
---------------------
एक आॅगस्टपासून राज्यभरात आॅनलाईन अर्ज भरण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शासनाचा महसूल वाढणार असून इच्छुकांना कार्यालयात न येता १३ प्रकारच्या सेवा मिळणार आहेत.
- रवींद्र आवळे,
अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर
----------------------------
मद्यसेवन परवाना
- एक दिवस - लगेच
- वार्षिक - एक आठवडा
- आजीवन - एक आठवडा

Web Title: Drinking alcohol license now online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.