राज्यात मिळणार निर्भेळ मद्य!
By Admin | Published: April 19, 2016 04:19 AM2016-04-19T04:19:33+5:302016-04-19T04:19:33+5:30
अवैध आणि बनावट मद्य विक्रीस आळा घालून शासनाच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्यात निर्मिती, आयात व विक्री होणाऱ्या मद्याच्या बाटल्यांवर ‘ट्रॅक अँड ट्रेस’ सुविधेसह
मुंबई : अवैध आणि बनावट मद्य विक्रीस आळा घालून शासनाच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्यात निर्मिती, आयात व विक्री होणाऱ्या मद्याच्या बाटल्यांवर ‘ट्रॅक अँड ट्रेस’ सुविधेसह पॉलिस्टर बेस्ड होलोग्राम लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ३ हजार कोटींची भर पडेल, अशी माहिती अबकारी खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
या निर्णयाची अंमलबजावणी व नियंत्रण यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव व आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. नेमण्यात आलेले निविदाकार शासनाच्या नियोजित जागी व नियंत्रणाखाली या होलोग्रामची निर्मिती करून राज्यातील सर्व मद्य उत्पादकांना व आयातदारांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखाली त्याचा पुरवठा करणार आहेत.
यामुळे होलोग्रामची नक्कल करणे किंवा अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्री करणे शक्य होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे. होलोग्राममध्ये अंतर्भूत असलेल्या वैशिष्ट्यासह ‘ट्रॅक अँड ट्रेस’ प्रणालीचा सुद्धा समावेश असणार आहे. (विशेष प्रतिनिधी)