पुण्यात गाडी चालवताना कॅब चालकाचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 07:12 PM2017-09-09T19:12:07+5:302017-09-09T19:13:10+5:30
आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब चालकाचा गाडी चालवताना ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
वाकड, दि. 9 - आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब चालकाचा गाडी चालवताना ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हिंजवडी फेज २ येथील विप्रो सर्कल रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत हिंजवडी ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नवनाथ विश्वनाथ गौंड (वय ४१, रा. मारुंजी, मुळ गाव. लातूर) असे त्या वाहन चालकाचे नाव आहे. याबाबत हिंजवड़ी पोलिसांनी दिलेली माहिती अशी नवनाथ हे आयटी पार्क मधील कंपन्यांच्या अभियांत्यांना पीकअप-ड्रॉप करतात. शुक्रवारी दुपारी विप्रो सर्कलच्या रस्त्यावर एमएच १४, एनएक्स १०३२ ह्या क्रमांकाची इंडिका मोटार लावून स्टेअरिंगवर डोक ठेवून ते झोपल्याचे दिसले.
काही वेळाने कंपन्या सुटल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिस मोटार बाजूला घे म्हणून सांगण्यासाठी गेले असता काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी ते बेशुद्धा अवस्थेत होते. हिंजवडी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.