महाड दुर्घटनेतील राजापूर-बोरिवली बसचा चालक परभणीतील

By admin | Published: August 3, 2016 01:34 PM2016-08-03T13:34:24+5:302016-08-03T13:34:24+5:30

पावसामुळे सावित्री नदीवरील पूल वाहून गेला असून त्यामध्ये दोन बस व अनके वाहनेही वाहून गेली आहेत.

The driver of the Rajapur-Borivli bus in Mahad accident Parbhani said | महाड दुर्घटनेतील राजापूर-बोरिवली बसचा चालक परभणीतील

महाड दुर्घटनेतील राजापूर-बोरिवली बसचा चालक परभणीतील

Next
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. ३ -  मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला असून त्यावरील दोन बस तसेच १२-१५ वाहनेही वाहून गेली आहेत. दरम्यान त्या दोन बसपैकी एमएच ४० एन-१७३९ क्रमांकाच्या राजापूर-बोरिवली एसटी बसचा चालक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील अंरवेली येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. 
अंतरवेली येथील गोरखनाथ सिताराम मुंडे हे तीन ते चार वर्षापूर्वी रायगड  आगारात चालक म्हणून नोकरीला लागले होते. चिपळूण आगारात त्यांची नियुक्ती असून, चिपळून येथेच ते कुटूंबियासह राहत असल्याची माहिती अंतरवेली येथील त्यांच्या नातेवाईकांनी दिली़. 
 

Web Title: The driver of the Rajapur-Borivli bus in Mahad accident Parbhani said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.