चालकांना वेतन नाही
By admin | Published: October 3, 2016 03:29 AM2016-10-03T03:29:02+5:302016-10-03T03:29:02+5:30
आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला असतांनाच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार वाहन चालकांच्या थकित वेतनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला
पालघर: जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला असतांनाच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार वाहन चालकांच्या थकित वेतनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका व सरकारी वाहने चालविण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या वाहन चालकांचे ४ महिन्याचे मानधन थकित असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणी वर आलेला आहे. जिल्ह्यात ३९ वाहनांसाठी सहा वर्षांपूर्वी कंत्राटी चालक नियुक्त झाले. चोवीस तास काम करावे लागत असूनही त्यांना केवळ सहा हजार रु पये मासिक वेतन दिले जात आहे. ते ही चार महिन्यांपासून रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ते वाढवून मिळावे, अशी मागणी या वाहन चालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. आम्हाला रुग्णसेवेसह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका, औषधे व अन्य सामानाची ने-आण करणे, रात्री अपरात्री आलेल्या रु ग्णांना संदर्भ उपचारासाठी तालुक्याला नेणे आदी कामे करावी लागत असून वेतन वेळेवर मिळत नसल्याने आम्ही पोट कसे भरायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे.
(वार्ताहर)