आता शेतकऱ्यांच्या हाती असणार ड्रोन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:05 AM2020-12-07T06:05:46+5:302020-12-07T06:06:23+5:30
संशोधनासाठी १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत
पंढरपूर (जि. सोलापूर) : आधुनिक शेतीसाठी ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर लक्ष ठेवण्याचे संशोधन श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रशांत पवार यांनी सुरू केले आहे. पवार यांना महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी रिसर्च फाउंडेशनने ४५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांत संशोधन पूर्ण करुन शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
संशोधनासाठी १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत. पक्ष्यांकडून पिकांची नासाडी होऊ नये, यासाठी ड्रोनमधून विविध आवाज देखील येतील. ड्रोनमधून घेण्यात येणाऱ्या फोटोच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधणे, त्यानंतर आवश्यकतेनुसार कामे करता येणार आहेत. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.
आवश्यक तेवढ्या उंचीवर उडणारे व कमी किमतीत ड्रोन मिळावे यादृष्टीने देखील संशोधन करणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.