पुणे जिल्ह्यात १४४ गावांमध्ये दुष्काळ
By admin | Published: March 17, 2016 01:41 AM2016-03-17T01:41:58+5:302016-03-17T01:41:58+5:30
जिल्ह्यात रब्बी हंगामात १४४ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. शासनाच्या निकषानुसार, या दुष्काळग्रस्त
पुणे : जिल्ह्यात रब्बी हंगामात १४४ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. शासनाच्या निकषानुसार, या दुष्काळग्रस्त गावांमध्ये प्राधान्याने टँकर पुरवणे, कृषी पंपाच्या वीजबिलामध्ये सवलत, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसुलात सूट आणि पीककर्जांचे पुनर्गठण आदी उपाययोजना लागू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वांधिक ६४ गावे बारामती तालुक्यात इंदापूर ३४, दौंड ३२ आणि पुरंदर तालुक्यातील १४ गावांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आज अखेर ६४ टँकर सुरू असून, आतापर्यंत २ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.