दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:13 PM2019-03-31T17:13:59+5:302019-04-01T18:11:15+5:30

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात.

Drought and examination of loksabha candidates. | दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

googlenewsNext

 

मुंबई-  सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी-विरोधक लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील अनके दुष्काळी भागात लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. ग्रामीण भागात पायपीट करून ही पाणी मिळत नाही. माणसांन प्रमाणे जनावरांना हि पाण्याची कमतरता भासत आहे. मराठवाड्यात तर जवळपास सर्वत्र सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. महत्वाचे प्रकल्प जवळपास आटली आहेत.

निवडणुकीत सर्वत्र उमेदवार घोषणाचा पाऊस पाडत आहे, मात्र त्यावेजी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी कुणाकडे वेळ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच सरकारने दुष्काळाची घोषणा करून टाकली. दुष्काळ जाहीर झाला खरा पण सरकार कडून दुष्काळी भागात अजूनही सरकरी योजनांची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मत मागण्यासाठी जाणाऱ्या उमदेवाराना दुष्काळी भागातील नागरिकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात. विरोधकांना राज्यातील जनतेसाठी आम्ही सरकार कडे केलेल्या मागण्या तर सरकारला आम्ही किती दिले हे सांगायला निमित्त असते. मात्र अजून निवडणुकीत हवी तसे वातावरण निर्माण झाले नसली तरी मत माघायला जाणाऱ्या उमेदवारान मात्र दुष्काळी जनतेच्या प्रश्नाचा उत्तर द्यावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील उमदेवार यांची मात्र चागलीच गोची होणार आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहयला मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना कसे समोर जावे हे उमेदवारांसाठी उव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या काळात आलेले दुष्काळ उमेदवाराची परीक्षा घेणार आहे हे मात्र नक्की.

Web Title: Drought and examination of loksabha candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.