मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग ?

By Admin | Published: July 16, 2015 04:04 AM2015-07-16T04:04:12+5:302015-07-16T04:04:12+5:30

मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या

Drought cloud in Marathwada, central Maharashtra? | मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग ?

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग ?

googlenewsNext

पुणे : मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसण्याची भीती आहे.
राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असून लातूर व परभणी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भाकीत वर्तविले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बळीराजा आधीपासूनच चिंतेत आहे. त्यातच पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ््यात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी झाली आहे. सुरवातीच्या पावसामुळे पिकांची उगवण झाली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके जळू लागली आहेत. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

१५ जिल्ह्यांत सरासरी
राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा २० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला तरी तो सरासरीएवढाच समजला जातो.
त्यानुसार १५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

Web Title: Drought cloud in Marathwada, central Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.