दुष्काळाचे संकट : पाच जिल्ह्यातील तब्बल २ लाख पशुधन चारा छावण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:51 AM2019-03-28T11:51:39+5:302019-03-28T11:56:16+5:30
राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत.
पुणे : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तीन जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने राहत शिबिरांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार १४२ पशुधनासाठी चाºयाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
परतीच्या पावसाने पाठ पिरवल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. नागरिकांबरोबरच पशुधनही दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्यात महसूल विभागातर्फे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पशुसंवर्धन विभागाने उस्मानाबाद ,जालना आणि परभणी या जिल्ह्यांसह नगर आणि बीड जिल्ह्यातही राहत शिबिर घेण्यास मान्यता दिली आहे. राज्यात एकूण ३६४ पशु छावण्या सुरू असून त्यात महसूल विभागाच्या ३५६ चारा चावण्या,पशुसंवर्धन विभागाची ६ राहत शिबिरे आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या दोन छावण्यांचा समावेश आहे.
राज्यात नगर जिल्ह्यात सध्या १६४ चारा छावण्या सुरू असून त्यात ८४ हजार ६९५ पशुधनाची देखभाल केली जात आहे. तर बीड जिल्ह्यातील १९२ चारा छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशुधन दाखल झाले आहे. या छावण्यांमध्ये लहान पशुधनाची संख्या २९ हजार १९४ असून मोठे पशूधन १ लाख ६५ हजार ८४८ एवढे आहे.राज्यात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली असताना अनेक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.
---
राज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन आहे. या पशुधनाला ११ लाख मेट्रिकटन हिरव्या वैरणीची तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता भासते. त्यामुळे राज्यात निर्माण झाली दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यात होणारी चारा टंचाई लक्षात घेवून पशुसंवर्धन विभागाने राज्यातील शेतकºयांना २५ हजार क्विंटल चारा पिकाच्या बियानाचे वाटप केले.आत्तापर्यंत राज्यातील १६ हजार ६३८ हेक्टर गाळपेर क्षेत्रावर आणि शेतकºयांच्या ४१ हजार ३५५ हेक्टर शेती क्षेत्रावर अशा एकूण ५७ हजार ८९४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे.
....
चारा छावण्या आणि राहित शिबिरातील पशुधनांची संख्या
- महसूल विभागाच्या छावण्या - ३५६
- पशु संवर्धन विभागाची राहित शिबिरे ६,
- स्वयंसेवी संस्थांच्या छावण्या -२
अहमदनगरमधील १६४ छावण्यांंमध्ये ८४ हजार ६९५ पशूधन
बीडमधील १९२ छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशूधन
एकूण - पशू छावण्यांची संख्या ३६४राहत शिबिरात पशुधन
पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहत शिबिर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २ राहत शिबिरे सुरू असून त्यात ९ हजार ८०० पशुधन आहे. तर बीड जिल्ह्यातील राहत शिबिरात ३ हजार ९०० तर जालनामध्ये १५६, परभणीत ६९० आणि नगरमध्ये ३८० पशुधन दाखल झाले आहे. पशूसंवर्धन विभागातर्फे चारा छावण्या व राहत शिबीरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शिबीराच्या आयोजकांची असते,असेही पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांनी स्पष्ट केले.