दुष्काळग्रस्तांना दिलासा; 1450 कोटींचा पहिला हप्ता जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:49 PM2019-02-05T21:49:01+5:302019-02-05T21:49:22+5:30
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्याती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मदत राज्य सरकारने देऊ केली आहे. 1450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी हा निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. या मदतीचा पहिला हप्ता आज वितरित करण्यात आला. राज्यातील विभागिय आयुक्तांकडे हा निधी सोपविण्यात आला आहे. त्यांच्याद्वारे हा निधी दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना दिला जाणार आहे. तेथील तहसीलदार हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करणार आहेत. यामध्ये काही गडबड होऊ नये यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.