राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:31 AM2019-05-03T03:31:05+5:302019-05-03T03:31:34+5:30

४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील आकडेवारी

Drought situation in the state is critical; 8.32 lakh cattle feed in the camps | राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

Next

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून तब्बल ८ लाख ३२ हजार जनावरे १ हजार २६४ चारा छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असून आताच ४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणारी आकडेवारी गुरुवारी मांडण्यात आली. राज्यातील ३ हजार ६९९ गावे आणि ८ हजार ४१७ वाड्यांवर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ९३७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदा त्यात आतापर्यंत ३ हजार ८३७ टँकरची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४७१ छावण्या सुरू आहेत. पुणे विभागात सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात १११, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात ६८२ छावण्या सुरू आहेत. चारा छावण्यांमधील मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये तर छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ४५ रुपये अनुदान दिले जात आहे. वीज थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आलेल्या ३ हजार ३२० पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात आली. ही सवलत एकूण ६७३ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार ४३१ कामे सुरू आहेत. त्यावर २ लाख ७४ हजार मजूर काम करीत आहेत.

विम्याची रक्कम आठ दिवसांत
राज्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे वाटप येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येईल. त्या पोटी ३ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५६२ कोटी रुपयांची मदत राज्याला दिली आहे. राज्यातील ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना आतापर्यंत ४ हजार ४१२ कोटी रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Drought situation in the state is critical; 8.32 lakh cattle feed in the camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.