दुष्काळी जिल्हय़ातील पाणीसाठय़ाचे होणार सर्वेक्षण!
By admin | Published: July 8, 2016 12:07 AM2016-07-08T00:07:01+5:302016-07-08T00:07:01+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्हय़ांची निवड.
संतोष येलकर/अकोला
राज्यातील दुष्काळी भागातील पाणीसाठय़ाचे सर्वेक्षण शासनामार्फत प्राधिकृत सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटच्या चमूमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
गत दोन वर्षात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता आणि पाण्याची मागणी याबाबतची तपशीलवार माहिती संकलित करण्यासाठी ह्यसीआयआयह्ण या संस्थेच्या त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटच्यावतीने ह्यवॅटस्कॅनह्ण या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटच्या चमूमार्फत निवड करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळी १३ जिल्ह्यांतील पाणीसाठय़ाचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत २ जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले.
पाणी आराखड्यासाठी होणार मदत!
दुष्काळी भागातील पाणीसाठय़ाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात घेण्यात येणार्या तपशीलवार माहितीच्या आधारे जिल्हानिहाय पाणी कृती आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार आहे.
सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेले १३ जिल्हे!
दुष्काळी भागातील पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता, पाण्याची मागणी व पुरवठा याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी शासनामार्फत अकोला, बुलडाणा, बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर व नंदूरबार इत्यादी १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.