मराठवाड्यात सोमवारी दुष्काळ पाहणी
By admin | Published: August 8, 2015 01:37 AM2015-08-08T01:37:09+5:302015-08-08T01:37:09+5:30
मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्रसिंग हे १० ते १२ आॅगस्टदरम्यान दौऱ्यावर येत आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्रसिंग हे १० ते १२ आॅगस्टदरम्यान दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्तालयातील पथक बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, जालना, नांदेड या जिल्ह्णांतील दुष्काळी परिसराची पाहणी करणार आहेत.
महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, चाराटंचाई व नियोजनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला आहे. चारा दावणीला द्यायचा की डेपो अथवा छावण्या उभारून पुरवायचा, याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून काहीही आदेश आलेले नाहीत.
तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
औरंगाबाद : सततच्या नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील आणखी तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. हनुमान जिजाभाऊ नवले (२९, फुलारवाडी, जि. परभणी), वसंत रामकिशन तेलंग (गऊळ, जि. नांदेड) आणि भारत ज्ञानदेव जगदाळे (२९, गोपाळवाडी, जि. उस्मानाबाद) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत.
पाथरी (जि. परभणी) तालुक्यातील फुलारवाडी येथील हनुमान जिजाभाऊ नवले या शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. तसेच कंधार (जि. नांदेड) तालुक्यातील गऊळ येथील वसंत रामकिशन तेलंग यांनी गुरुवारी शेतातील आखाड्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. तेलंग यांच्यावर बँकेचे कर्ज होते़