उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांचा दुष्काळी दौरा

By admin | Published: September 3, 2016 06:40 PM2016-09-03T18:40:40+5:302016-09-03T18:40:40+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे दुष्काळ पाहणी दौरा करण्यात आला

Drought tour of office bearers after Uddhav Thackeray's order | उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांचा दुष्काळी दौरा

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांचा दुष्काळी दौरा

Next
>- ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 3 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे दुष्काळ पाहणी दौरा करण्यात आला. सदर दौऱ्यामध्ये राज्यमंत्री संजयजी राठोड, खासदार अरविंद सावंत यांच्या समवेत खेडचे आमदार सुरेश गोरे, लातूरचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, शेषराव भोमाळे, तालुकाप्रमुख सतिश शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या दुष्काळ दौऱ्यास लातूरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
लातूर जिल्ह्यातील भयंकर व सातत्याने असणाऱ्या दुष्काळाची पाहणी प्रत्यक्षपणे करण्यात आली. निलंगा व आवसा तालुक्यातील सामान्य जनता सदर दौऱ्यात आपल्या असंख्य अडचणी व दुष्काळाची व्यथा मांडत होते. आमदार सुरेश गोरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन जळलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
सदर जळलेल्या पिकांचे अनुदान मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांस अनुदान मिळून देऊ त्याचबरोबर मागील वेळी जिरायती शेतीला हेक्टरी ६८००, बागायती शेतीला १३,५०० व फळबागांसाठी १८००० इतके अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम मिळालेली नाही. तसेच मराठवाड्यामध्ये सुमारे ७५ कोटींचे अनुदान जाहीर करूनही सदर शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. त्यांनाही अनुदान त्वरित मिळणेसाठी पूर्ण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Drought tour of office bearers after Uddhav Thackeray's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.