आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:48 AM2023-11-06T09:48:13+5:302023-11-06T09:48:47+5:30

२०१८ मध्येही याच निकषावर दुष्काळ जाहीर केला होता असे मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे. 

Drought will be declared in some more talukas, relief will be given by relaxation of criteria | आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा  

आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा  

मुंबई : राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पाऊस कमी असलेल्या आणखीही काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे. यासाठी निकष निश्चित करून दिलासा दिला जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.

सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूरमधील ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर’मार्फत करण्यात आले. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. २०१८ मध्येही याच निकषावर दुष्काळ जाहीर केला होता असे मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे. 

निकष शिथील करून देणार दिलासा  
- केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक व प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेऊनच ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. 
- या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात कमी पाऊस झाला. त्याचा विचार करून काही निकष शिथील करून उर्वरित तालुक्यांना दिलासा देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

Web Title: Drought will be declared in some more talukas, relief will be given by relaxation of criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.