जलयुक्त शिवारमुळे होणार दुष्काळ निवारण!

By admin | Published: July 12, 2016 12:50 AM2016-07-12T00:50:49+5:302016-07-12T00:50:49+5:30

कारंजा येथे जलपूजनाचा कार्यक्रमात प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आशावाद व्यक्त केला.

Drought will be prevented due to water cut! | जलयुक्त शिवारमुळे होणार दुष्काळ निवारण!

जलयुक्त शिवारमुळे होणार दुष्काळ निवारण!

Next

कारंजा लाड (जि. वाशिम): जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारण करणे शक्य असून, या माध्यमातून दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. ही योजना निराशेला आशेत परावर्तीत करणारा कार्यक्रम असून यामुळे दुष्काळ निवारणाचे कार्य होणार आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे सोमवार, ११ जुलै रोजी केले.
कारंजा पंचायत समिती सभागृहात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आयोजित जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी शरद जावडे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, कृषी अधिकारी समाधान धुळधुले , परिविक्षाधीन तहसीलदार रमेश जेंशवंत , डॉ.निलेश हेडा आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.राजेंद्रसिंह पुढे म्हणाले, की जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदुषण, भूजलाचा पुनर्भरणापेक्षा अधिक प्रमाणात वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद, या आजच्या प्रमुख समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Drought will be prevented due to water cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.