समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Published: April 20, 2015 03:24 AM2015-04-20T03:24:28+5:302015-04-20T03:24:28+5:30

मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेल्या इजाज ऊल (२२) या तरुणाचा शनिवारी बुडुन मृत्यू झाला. मालवणीत राहणार इजाज आपल्या मित्रांबरोबर दुपारी आक्सा

Drowning in the sea | समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

Next

मुंबई/बोर्ली-पंचतन : मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेल्या इजाज ऊल (२२) या तरुणाचा शनिवारी बुडुन मृत्यू झाला. मालवणीत राहणार इजाज आपल्या मित्रांबरोबर दुपारी आक्सा बीचवर आला होता. मात्र तो एकटाच खोल पाण्यात गेला. अमावस्या असल्याने दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या ओहटीत त्याला समुद्रात आत खेचून घेतले अशी माहिती जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली. दुपारी ४.२० मिनिटांनी त्याचा मृतदेह दाणापाणी येथील किना-याला मिळाला.
दुस-या एका घटनेत श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रामध्ये शुभमज्योती शर्मा (२६) वर्षीय तरुणाचा शनिवारी रात्री बुडून मृत्यू झाला.पुण्यातील चार मित्र दिवेआगर, श्रीवर्धन समुद्रकिनारी पर्यटनासाठीआले होते. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वेळास गावाच्या स्मशानभूमीजवळील समुद्रामध्ये पोहताना शुभमज्योती शर्मा (रा. कोथरूड पुणे, मूळ गाव ओरिसा) याला पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या लाटेबरोबर बुडाला. याबाबत दिघी सागरी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)

Web Title: Drowning in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.