औषध दुकानदारांचा बेमुदत बंद

By admin | Published: June 27, 2014 12:30 AM2014-06-27T00:30:44+5:302014-06-27T09:27:59+5:30

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने गुरुवारपासून पुन्हा बेमुदत बंदची घोषणा केली.

Drug shopkeepers stalled | औषध दुकानदारांचा बेमुदत बंद

औषध दुकानदारांचा बेमुदत बंद

Next
>पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने गुरुवारपासून पुन्हा बेमुदत बंदची घोषणा केली. 
   फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांवर एफडीएकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे  ही कारवाई थांबवावी या मागणीसाठी गुरुवारी केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी एफडीएच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. असोसिएशनच्या जुगलकिशोर तापडिया, अनिल बेलकर, संतोष खिंवसरा, विजय चंगेडिया, हरिभाई सावला, सुरेश बाफना या पदाधिका:यांनी एफडीएचे सह आयुक्त (प्रभारी) विनिता थॉमस यांना मागणीचे निवेदन दिले. 
या वेळी कारवाई करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी अधिकारी व कर्मचा:यांची समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या नंतर असोसिएशनने बंद मागे घेतला. मात्र दुपारी असोसिएशनच्या पदाधिका:यांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी एफडीएच्या अधिका:यांचे पथक पोचल्याचे वृत्त औषध दुकानदारांमध्ये पसरले. त्यानंतर शुक्रवार पेठेतील असोसिएशनच्या कार्यालयात औषध दुकानदारांनी गर्दी करीत बंद सुरु ठेवण्याची मागणी केली. या नाटय़मय घडामोडीनंतर असोसिएशनने सायंकाळी बेमुदत बंदची घोषणा केली. संघटनेचे सचिव विजय चंगेडिया म्हणाले, दुकानात फार्मासिस्ट नसल्यास एफडीएने जरुर कारवाई करावी. मात्र तपासणी दरम्यान लहानसहान गोष्टींवरुनही परवाने रद्द केले जात आहे. त्याचा दुकानदारांना संताप आहे. (प्रतिनिधी)
 
गुरुवारी सकाळी सकारात्मक चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला होता. एफडीला देण्यात आलेल्या निवेदनावर ज्यांच्या स्वाक्ष:या आहेत, त्यांच्या दुकानाच्या तपासणीसाठी एफडीएचे पथक दुपारी गेले. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. म्हणून पुन्हा बंदचा निर्णय घेण्यात आला.- विजय चंगेडिया, संघटनेचे सचिव 

Web Title: Drug shopkeepers stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.