ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:44 AM2017-12-18T02:44:56+5:302017-12-18T02:45:18+5:30

मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते.

 Drugmafia comic merchant finally got arrested from Goa, deals with police, misrepresented | ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा

ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा

Next

राजू ओढे 
ठाणे : मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते.
मुंब्रा येथील कोमील मर्चंट याचा गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थविरोधी पथकासह ठाण्याच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेत खबरी म्हणून बºयापैकी वावर होता. अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती त्याने अनेकदा पोलिसांना पुरवली. त्याने तंतोतंत माहिती दिल्याने अमली पदार्थविरोधी पथकाने अनेक कारवाया यशस्वीरीत्या केल्या. गत महिन्यात अमली पदार्थविरोधी पथकास मुंब्रा येथील अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती अन्य एका खबºयाकडून मिळाली होती. पोलिसांनी या कारवाईमध्ये दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ ग्रॅम मेफेड्रिन हस्तगत करण्यात आले होते. या आरोपींच्या चौकशीतून कोमीलचे नाव समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणाही क्षणभर हादरली होती.
काही वर्षांपूर्वी कोमील मुंब्रा येथे भंगारविक्रीचा व्यवसाय करायचा. हळूहळू तो पोलिसांच्या संपर्कात आला. त्याने या भागातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना पुरवण्यास सुरुवात केली. अमली पदार्थांची तस्करी करणाºया अनेक लहान-मोठ्या गुन्हेगारांना पोलिसांनी त्याच्या माहितीवरूनच गजाआड केले. सूत्रांच्या मतानुसार यामागे कोमीलचे कपट दडलेले होते. त्याने एकीकडे अमली पदार्थांच्या तस्करांचे पत्ते पोलिसांच्या मदतीने साफ करताकरता स्वत: या गोरखधंद्यात पाय रोवले. पोलिसांशी असलेल्या संबंधांचा त्याने पुरेपूर गैरफायदा घेतला. पोलिसांच्या कारवायांची पद्धत बारकाईने ठाऊक असल्याने पोलीस शिपायापासून वरिष्ठांकडे ऊठबस असलेल्या कोमीलने लवकरच या धंद्यात जम बसवला. गत महिन्यात अमली पदार्थाच्या एका गुन्ह्यामध्ये कोमीलचे नाव समोर आल्यानंतर चांगलेच वादळ उठले होते. राजकीय वर्तुळातही वजन असलेल्या कोमीलविरोधात आठ दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मगुरूंनी मुंब्रा येथे पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाईची मागणी केली होती. तेव्हापासून अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्या अटकेसाठी कंबर कसली होती. मुंब्रा येथे गेले आठ दिवस पोलिसांनी पाळत ठेवून काहीच उपयोग झाला नाही. अखेर, गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथक गोवा येथे पाठवण्यात आले होते. तेथून कोमीलला अटक करण्यात आली. या कारवाईचा नेमका तपशील समोर आला नसला, तरी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Web Title:  Drugmafia comic merchant finally got arrested from Goa, deals with police, misrepresented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.