ललितचा एन्काऊंटर नका करू, आईची पोलिसांना विनंती; ड्रग्ज प्रकरणी मोठे मासे अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:41 AM2023-10-18T11:41:22+5:302023-10-18T11:41:55+5:30

मुंबई पोलिसांना तपासात ललितने सहकार्य करावे. त्याला फसवून या मार्गाला टाकले गेले. त्याला टॉर्चर करण्यात येत होते असा आरोप त्याच्या आईने केला.

Drugs Case: Don't encounter Lalit Patil, mother requests police; Will the big name get involved in the drug case? | ललितचा एन्काऊंटर नका करू, आईची पोलिसांना विनंती; ड्रग्ज प्रकरणी मोठे मासे अडकणार?

ललितचा एन्काऊंटर नका करू, आईची पोलिसांना विनंती; ड्रग्ज प्रकरणी मोठे मासे अडकणार?

नाशिक – ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. ललितच्या अटकेनंतर आता या प्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यात ललितनं इतका मोठा गुन्हा केला नाही की त्याचा एन्काऊंटर करावा, पोलिसांनी ललितची एन्काऊंटर करू नये अशी विनंती त्याच्या आईनं पोलिसांना केली आहे.

ललित पाटीलची आई म्हणाली की, माझ्या मुलाचे एन्काऊंटर करू नका, त्याच्यामागे २ मुले आणि आई वडील आहेत. मला त्याचा एन्काऊंटर होईल अशी भीती वाटते. त्यामुळे असं करू नका. पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली. ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू असं पोलिसांनी धमकी दिली होती. त्यामुळे मला भीती वाटते. ललितला फसवले आहे. जी शिक्षा असेल ती भोगावी असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुंबई पोलिसांना तपासात ललितने सहकार्य करावे. त्याला फसवून या मार्गाला टाकले गेले. त्याला टॉर्चर करण्यात येत होते. पैशांची मागणी होत होती. ललितचे ऑपरेशन होणार होते, म्हणून ससूनला दाखल केले असं आईने म्हटलं. तर माझी तब्येत बिघडली आहे. बीपी, सुगरचा त्रास आहे. ललितला जन्म दिला हा आमचा गुन्हा आहे का? ३ वर्षापासून तो जेलमध्ये होता, आमची भेट नाही. पोलीस आम्हाला त्रास देतायेत. नातवांना तुमचे आयुष्य बर्बाद करू असं पोलीस म्हणतात. त्यांची चूक काय? ललितने तपास यंत्रणांना सहकार्य करावे. जे खरे असेल ते सांगावे असं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

मी पळालो नाही, पळवलं आहे – ललित पाटील

२ आठवड्यापूर्वी ड्रग्जमाफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. ललितला पळवण्यामागे नाशिकच्या मंत्र्यांचा हात आहे असा आरोप काँग्रेस आमदाराने केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट या प्रकरणी दादा भुसे यांचे नाव घेत ललितला पसार होण्यास मदत केली असा आरोप केला. त्यानंतर ललितचा पुणे, मुंबई पोलीस शोध घेत होते. यात मुंबई पोलिसांना यश आले. चेन्नईतून श्रीलंकेला पळून जाण्याचा इरादा असताना मुंबईत पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला शहरात आणल्यानंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ललित पाटीलने मोठा दावा केला आहे. मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आले. यामागे कोणाकोणाचा हात आहे मी सगळे सांगेन असं विधान केले आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणी मोठे मासे अडकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Drugs Case: Don't encounter Lalit Patil, mother requests police; Will the big name get involved in the drug case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.