दारुच्या नशेत मित्रानंच हत्या, आरोपी फरार
By admin | Published: February 15, 2017 02:07 PM2017-02-15T14:07:48+5:302017-02-15T20:25:18+5:30
औसा तालुक्यातील हरेगाव येथे एका मित्राने दारुच्या नशेत आपल्या मित्राची हत्या केल्याची घटन मंगळवारी रात्री उशीरा घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 15 - औसा तालुक्यातील हरेगाव येथे एका मित्राने दारुच्या नशेत आपल्या मित्राची हत्या केल्याची घटन मंगळवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, आरोपी फरार आहे. आरोपीच्या अटकेसाठी औसा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
औसा तालुक्यातील हरेगाव येथील मारोती बाबुराव माने (५२) हे मंगळवारी रात्री घरी झोपले असता त्यांचा मित्र खंडू सुरवसे (३०) हा घरी आला. त्यांना झोपेतून उठवून घराबाहेर घेऊन गेला. मारोती बाबुराव माने हे पहाटेपर्यंत घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता गावात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांचा मित्र खंडू सुरवसे हा गावातून फरार असल्याचे समजले. मारोती माने यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. या घटनेची माहिती औसा पोलिसांना देण्यात आली. औसा पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. फरार असलेले आरोपी खंडू सुरवसे याच्या अटकेसाठी औसा पोलीसांचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिली़
हत्येचं कारण अस्पष्ट
मृत मारोती बाबुराव माने यांच्या हत्येचं कारण मात्र बुधवारी दुपारपर्यंत अस्पष्टच होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी मारोती माने आणि खंडू सुरवसे या दोघांनी पूर्वी पार्टी केली होती. आधून मधून हे दोघे दारु ढोसत होते. दरम्यान मंगळवारी रात्रीही या दोघं एकत्र बसून दारू प्यायले होते. दरम्यान दारुच्या नशेतच खंडूने मारोती माने यांची हत्या केली असावी, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
खंडूचा स्वभाव विक्षिप्त
हरेगाव येथील खंडू सुरवसे हा पूर्वीपासूनच विक्षिप्त स्वभावाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले़ तो दारूच्या नशेत अनेकांना त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. मारहाण होण्याच्या भीतीने त्याची आई घरातून मंगळवारी निघून गेली होती. शिवाय, तो शेजा-यांनाही दारू ढोसून त्रास द्यायचा यातूनच त्याच्याविरोधात यापूर्वी तीन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.