अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया ठार

By Admin | Published: October 31, 2016 10:46 PM2016-10-31T22:46:28+5:302016-10-31T22:46:28+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील गजबजलेल्या घोटी टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

A drunken man killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया ठार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 31 -  मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील गजबजलेल्या घोटी टोल नाक्याजवळ ही घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती टोलनाका कर्मचा-यांनी पोलीस व वन विभागाला कळविल्यानंतर या मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्या नर असून तो पाच ते सहा वर्षचा आहे तसेच त्याची उंची अंदाजे तीन फूट व लांबी साडे पाच फूट तर वजन 90 किलो असल्याची माहिती   वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: A drunken man killed in an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.