पावसाळ्यात १९ दिवस समुद्र होणार ‘सैराट’

By admin | Published: May 16, 2016 03:01 AM2016-05-16T03:01:21+5:302016-05-16T03:01:21+5:30

यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Due to the 19 days of sea monsoon, 'Siraat' | पावसाळ्यात १९ दिवस समुद्र होणार ‘सैराट’

पावसाळ्यात १९ दिवस समुद्र होणार ‘सैराट’

Next

मुंबई: यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. सर्वत्र तापमानाचा पारा वाढत असताना सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ््यात १९ दिवस सागराला उधाण येणार असल्याची माहिती पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीच्या वेळी जर मोठी पर्जन्यवृष्टी झाली, तर मुंबईत विविध ठिकाणी पावसाचे खूप पाणी साचेल. या वर्षी पावसाळ््यात विशेषत: जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त मोठ्या भरतीचे दिवस व वेळा असणार आहेत. या कालावधीत जास्त पाऊस पडल्यास अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सोमण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
>नालेसफाईकरिता
३१ मे ची मुदत!
नाल्यांमधील गाळ वर्षभर टप्प्याटप्प्याने काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्यानुसार, पावसाळ्यापूर्वी ६० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र, नालेसफाई घोटाळ्यामुळे ठेकेदार मिळण्यास विलंब झाला़ त्यामुळे गेल्या महिन्यात नाल्यांमधील गाळ काढण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली़ हे काम संथगतीने सुरू आहे़ ३१ मे ही नालेसफाईची डेडलाइन दरवर्षी चुकत असल्याने, वेळापत्रकानुसारच कामे पूर्ण करण्यास आयुक्त अजय
मेहता यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.

Web Title: Due to the 19 days of sea monsoon, 'Siraat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.