एकमेकांवरील आरोप करण्याने मराठा आंदोलनाची दिशा भरकटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:49 PM2018-10-08T19:49:31+5:302018-10-08T19:57:44+5:30
एकमेकांवर करण्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटली असल्याचा सुर मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित दिशादर्शक मेळाव्यात आळवण्यात आला.
Next
पुणे : एकमेकांवर करण्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटली असल्याचा सुर मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित दिशादर्शक मेळाव्यात आळवण्यात आला. मराठा क्रांती माेर्चाच्या अारक्षणासहित केलेल्या विविध मागण्यांचा अाढावा घेण्यासाठी अाठ अाॅक्टाेबरला दिशादर्शक मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले होते.यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी सांगण्यात आले की, जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर मराठा मोर्चा लढा कायम ठेवणार आहे.मराठा बांधवांनी आपापसातील वाद टाळावेत, मोर्चामध्ये एकोपा ठेवला होता त्याप्रमाणे एकोप्याने वागावे.
यावेळी व्यक्त झालेले मुद्दे खालीलप्रमाणे :
- यापुढे मराठा क्रांती मोर्चा 12 विविध विषयांवर 12 समित्या स्थापन करणार
- तालुका पातळीवर देखील समित्या स्थापन करून दर महिन्याला बैठका घेऊन त्यात समितीचा आढावा घेतला जाणार
- आंदोलनकर्त्याचे खटले लढविलेल्या वकील बांधवांचा सत्कार करण्यात आला
- 3784 पानांचे पुणे जिल्ह्यातर्फे निवेदन देण्यात आले त्यात मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टीने मागास आहे याची मांडणी
- मराठा क्रांती मोर्चा, पुणे येथे झालेला खर्च 46 लाख 30 हजार 957रुपये
- मुंबई मोर्चा खर्च 8 लाख 77 हजार 799 रुपये
- नागपूर मोर्चा खर्च 1 लाख 21 हजार 780 रुपये