आंदोलनामुळे दूधपुरवठा घटला

By admin | Published: June 6, 2017 01:24 AM2017-06-06T01:24:15+5:302017-06-06T01:24:15+5:30

शहरासह राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील दूधपुरवठ्यावर सोमवारी परिणाम झाला

Due to the agitation, milk supply will be reduced | आंदोलनामुळे दूधपुरवठा घटला

आंदोलनामुळे दूधपुरवठा घटला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासह राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील दूधपुरवठ्यावर सोमवारी परिणाम झाला; मात्र शनिवारनंतर झालेल्या पुरवठ्यामुळे दूध उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला नाही. अशीच स्थिती राहिल्यास पुढील दोन दिवस
दूधटंचाईची शक्यता नाकारता येत नसल्याचे दूधविक्रेत्यांनी सांगितले.
शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील ३५ टक्के दुधाचे वितरण गवळ्यांमार्फत होते, तर विविध कंपन्यांच्या पिशवीबंद दुधामार्फत उर्वरित दुधाची गरज भागविली जाते. या आंदोलनाचा मोठा फटका पिशवीबंद दुधाच्या पुरवठ्यावर झाला आहे. आंदोलकांनी १ जूनपासून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज) तीन टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. सोमवारी संपामुळे कात्रजमध्ये केवळ ८० हजार लिटर दुधाचे संकलन होऊ शकले.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक क्षीरसागर म्हणाले की, ओतूर आणि वरवंड येथील दोन शीतकरणाचे प्रकल्प बंद होते. २.२५ लाख लिटर दुधाचे संकलन होत असते. त्यात सोमवारी ८० हजार लिटरपर्यंत घट झाली. मंगळवारी एक लाख लिटरपर्यंत दूध उपलब्ध होईल. श्रीकृष्ण चितळे म्हणाले की, सोमवारी दूध वितरण सुरळीत राहिले. मंगळवारीदेखील पुरेसे दूध उपलब्ध होईल. गणेश पेठ दूधभट्टी येथे दुधाची ३ हजार लिटर इतकी आवक झाली. मागणीमुळे दुधाला प्रतिलिटर ७४ ते ७५ रुपये इतका दर मिळाल्याचे व्यापारी दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले.

Web Title: Due to the agitation, milk supply will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.