महिलेच्या सतर्कतेमुळे ‘घरफोडया’ जेरबंद, आईमुळे वाचले मुलाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 09:29 PM2017-10-04T21:29:27+5:302017-10-04T21:30:11+5:30

डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना दुसरीकडे अंजली घाडीगांवकर (वय 39) या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला.

Due to alertness of the woman, 'Gharafoda' was martyred, mother's soul survived | महिलेच्या सतर्कतेमुळे ‘घरफोडया’ जेरबंद, आईमुळे वाचले मुलाचे प्राण

महिलेच्या सतर्कतेमुळे ‘घरफोडया’ जेरबंद, आईमुळे वाचले मुलाचे प्राण

Next

डोंबिवली -  शहरात घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना दुसरीकडे अंजली घाडीगांवकर (वय 39) या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला. विशेष बाब म्हणजे घरात घुसलेल्या चोरटयाकडून अंजली यांचा मुलगा प्रणव (वय 14) याला जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला परंतुु त्याचवेळी कामावरून घरी परतलेल्या अंजली यांनी आरडाओरडा केल्याने प्रणव याचे प्राण वाचले आणि आजुबाजुला राहणा-या रहिवाशांनी  पळणा-या चोरटयाला बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. 
अंजली या मुंबई बांद्रा येथे कामाला आहेत त्यांचे पती आशिष देखील कामानिमित्त मुंबईला जातात. डोंबिवली पुर्वेकडील राजाजी पथ, म्हात्रे नगरमधील विनीत सदनमध्ये राहणारे घाडीगांवकर पती-पत्नी दोघेही नेहमीप्रमाणो मंगळवारी कामाला मुंबईला गेले होते. तर पाटकर शाळेत इयत्ता आठवीत शिकणा-या प्रणवची बुधवारपासून सहामाही परिक्षा असल्याने मंगळवारी त्याला सुट्टी होती. त्यामुळे तो आणि त्याची आजी सरस्वती असे दोघेच घरात होते. परंतु, सरस्वती या डॉक्टरकडे गेल्याने प्रणव दुपारच्या सुमारास घरी एकटाच होता. दुपारी प्रणव हा घराला लॉक लावून आईस्क्रिम खाण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच कालावधीत चोरटयाने घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडुन त्यातील ऐवज चोरण्याचा चोरटयाचा खटाटोप चालू असतानाच प्रणव हा घरी परतला असता त्याच्या हा प्रकार निदर्शनास पडला. प्रणवने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयाने त्याचा गळा आवळीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतू परिक्षा असल्याने प्रणवचा अभ्यास घेण्यासाठी कामावरून लवकर घरी परतणा-या अंजली त्याचवेळेस सुदैवाने घरी आल्या आणि समोरचा प्रकार पाहून त्यांना एक च धकका बसला, त्यांनी हा सर्व प्रकार पाहताच जोरदार आरडाओरड करायला सुरूवात केली. या आवाजाने मदतीसाठी घराकडे धाव घेतलेल्या रहिवाशांनी आणि नागरीकांनी पळणा-या चोराला पकडले आणि बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. रेहान फुरखान खान (वय 36 ) असे या चोरटयाचे नाव असून तो उत्तरप्रदेश मधील मेरठ, बाजारघर येथील राहणारा आहे. पोलिसांना घटनास्थळी लोखंडी कटावणी आढळुन आली असून चोरटा घरातील 3क् हजार रूपयांचे सोन्याचे दागिने आणि 8 हजार 5क्क् रूपयांची रोकड असा 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा करत होता. परंतू अंजली यांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. या घरफोडीच्या घटनेची रामनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चोरटा रेहान याला बुधवारी कल्याण जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 6 ऑक्टोबर्पयत  दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Due to alertness of the woman, 'Gharafoda' was martyred, mother's soul survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.