रथाची चाकं पंक्चर झाल्याने पालखी सोहळ्याला 2 तासांचा उशीर
By Admin | Published: June 29, 2016 06:02 PM2016-06-29T18:02:43+5:302016-06-29T18:02:43+5:30
आळंदीवरून पुण्याकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालाखी रथाची दोन चाके दिघी मँगझीन चौकात पंक्चर झाल्याने तब्बल दोन तास उशीराने पालखी सोहळयाने पुणे शहराच्या हददीत प्रवेश केला
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">पुणे : आळंदीवरून पुण्याकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालाखी रथाची दोन चाके दिघी मँगझीन चौकात पंक्चर झाल्याने तब्बल दोन तास उशीराने पालखी सोहळयाने पुणे शहराच्या हददीत प्रवेश केला. दरम्यान याच वेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बोपोडी येथे महापालिका हददीत येणार असल्याने तसेच संत ज्ञानेश्वर महारांच्या पालखीस उशीर होत असल्याने महापौर प्रशांत जगताप यांनी प्रथमच महापालिकेच्या हददीबाहेर जाऊन दिघी येथे पालखी सोहळयाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता हा पालखी सोहळयाने म्हस्के वस्ती येथे महापालिका हददीत प्रवेश केला. महापौरांसह उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांनी हददीबाहेर जाऊन पालखी सोहळयाचे स्वागत केले असल्याची ही बाब असल्याची माहिती अनेक वारकरी तसेच पालिकेच्या ज्येष्ट सदस्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
संत ज्ञानेशवर महाराजांची पालखी सकाळी सहा वाजता आळंदी येथील गांधीवाडा येथून निघते, त्यानंतर हा सोहळा थोरल्या पादुका साईबाबा मंदीर येथ विसावा घेऊन तिथून साडेनऊच्या सुमारास पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होतो. त्यानंतर सुमारे साडेबाराच्या सुमारास हा सोहळा म्हस्केवस्ती येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिका हददीत प्रवेश करतो. या वेळापत्रकानुसार, महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि महापालिकेचे पदाधिकारी म्हस्केवस्ती येथे स्वागतासाठी उभे होते. मात्र, त्यापूर्वी साडेदहाच्या सुमारास रथाचे एक चाक दिघी मँगझीन चौकात पंक्चर झाल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर या चाकाची पंक्चर काढून रथ पुढे जाणार तो पर्यंत दुसरे चाकही पंक्चर झाल्याचे लक्षात आले. या चाकाची पंक्चर काढे पर्यंत जवळपास दिड ते पाऊने दोन तासांचा उशीर झाला. दरम्यान, याच वेळे दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापौरांना जायचे असल्याने महापौर प्रशांत जगताप यांनी एकच्या सुमारास पालिकेच्या पदाधिका-यांसह दिघी मँगझीन चौक गाठत त्या ठिकाणी जाऊनच पादूका दर्शन घेतले. त्यानंतर सुमारे अडीच वाजता हा पालखी सोहळा म्हस्के वस्ती येथून पुणे शहराकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास हा सोहळा फुले नगर येथील पालखी दत्त मंदीर येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.