परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:58 AM2017-11-19T00:58:07+5:302017-11-19T00:58:20+5:30

पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

Due to circumstantial evidence, the guilty in the Kopardi case - bright Nikam | परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

Next

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपींना विविध आठ कलमान्वये न्यायालयाने दोषी ठरविले आहे. पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ते म्हणाले, घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. मनुष्य खोटे बोलू शकतो, मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही, या म्हणीचे या खटल्यात प्रत्यंत्तर आले. आरोपी क्रमांक एकचा रक्तगट ‘ओ ग्रुप’ होता. पीडित मुलीचा रक्तगट ‘ए ग्रुप’चा होता. आरोपी एकच्या कपड्यावर जे रक्त मिळाले, ते ‘ए गु्रप’चे होते, असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे खटल्यात होते.
घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी क्रमांक दोन आणि तीनचे कृत्य काय होते, याचे पुरावे न्यायालयाला दिले. ते सर्व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अत्याचार करून खून करणे, अत्याचार व खूनाचा कट रचणे आणि अत्याचार व खुनासाठी प्रोत्साहित करणे यासाठी कायद्यात दोन शिक्षा आहेत.
कमीत कमी जन्मठेप आणि फाशी. दोषसिद्धीनंतर सर्व पुराव्यांचा विचार करून न्याययोग्य शिक्षा देण्यासाठी पुढील युक्तिवाद करणार आहे.
खटल्यात सोबत काम करणारे पोलीस अधिकारी, सामान्य जनता, पीडित मुलीचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक यांनी न घाबरता साक्ष दिली, त्या सर्वांचे हे यश आहे. जनतेने शांततेने खटल्याचा निकाल स्वीकारला पाहिजे आणि राज्यातील शांतता अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल
कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती़ न्यायालयात तीनही आरोपींवर दोष सिद्ध झाल्याने समाधान आहे़ अपेक्षेप्रमाणे निकाल लागून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल़, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे असे अपराध पुन्हा घडणार नाहीत.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

कोपर्डीसारखा गुन्हा पुन्हा होऊ नये. कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


‘ती’ स्त्री असल्याची आधीच शिक्षा मिळाली आहे़ तिच्यावर अत्याचार करणाºया आरोपींना न्यायालयाने दोषी धरल्याने मोठे समाधान आहे़ तिघा आरोपींना फाशी व्हावी.
- आ. नीलम गोºहे, शिवसेना उपनेत्या

Web Title: Due to circumstantial evidence, the guilty in the Kopardi case - bright Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.