नीलेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना-भाजपात दुरावा आणखी वाढला

By अतुल कुलकर्णी | Published: January 16, 2019 06:23 AM2019-01-16T06:23:27+5:302019-01-16T13:56:06+5:30

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप केले आहेत.

Due to the controversial statement of Nilesh Rane, the distinction between the Shiv Sena and the BJP increased further | नीलेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना-भाजपात दुरावा आणखी वाढला

नीलेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना-भाजपात दुरावा आणखी वाढला

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : माजी खा. नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि गायक सोनू निगम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपा-शिवसेनेतील दरी आणखी वाढली आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेनेकडून आ. विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, नीलेश राणे अनेकदा शुद्धीत नसताना काहीही बरळत असतात. जर अशी विधाने नारायण राणे यांनी केली असती तर त्यांना शिवसेना काय आहे हे कळाले असते. मात्र, या असल्या पोरकट विधानावर बोलून मी कशाला वेळ घालवू? असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ज्या पक्षात ‘स्वाभिमान’ नसलेले उणेपुरे तीन सदस्य आहेत आणि तिघेही तीन पक्षात आहेत, त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे? कोणीतरी उठतो आणि जी व्यक्ती हयात नाही त्यांच्याविषयी वाट्टेल ते बोलतो. त्यातून त्याची अक्कल समजली. ज्या वेळी नारायण राणे यांना काही मिळते किंवा मिळण्याची चिन्हे दिसू लागतात, त्यावेळी त्यांचेच पुत्र असे काहीही बोलून त्यांचे वाटोळे करत आल्याचा इतिहास असल्याचेही ते म्हणाले.

राणे यांना स्वतंत्रपणे कोकणातील जागा देऊन त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत घेण्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हालचाली करत असल्याच्या कुणकुणीमुळेच खा. नारायण राणे यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरानामा समितीत घेत त्यांची राजकीय कोंडी केल्याची चर्चा विरत नाही, तोच नीलेश राणे यांनी वादग्रस्त टीका केली. खा. राणे यांच्या जाहीरानामा समितीवरील नियुक्तीवर शिवसेनेत नाराजी होतीच. आता त्यात या विधानामुळे आणखी कटूता निर्माण झाली आहे. जर तुम्हाला राणे प्रेम ठेवायचे असेल तर ते तुमचे तुम्हाला लखलाभ, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Due to the controversial statement of Nilesh Rane, the distinction between the Shiv Sena and the BJP increased further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.