महागड्या डाळींमुळे दिवाळीपूर्वीच दिवाळे

By admin | Published: October 18, 2016 06:01 AM2016-10-18T06:01:05+5:302016-10-18T06:01:05+5:30

दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत.

Due to costly pulses, before Diwali, | महागड्या डाळींमुळे दिवाळीपूर्वीच दिवाळे

महागड्या डाळींमुळे दिवाळीपूर्वीच दिवाळे

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. एपीएमसीमध्ये पाच वर्षांपूर्वी चनाडाळ ३० ते ४० व तूरडाळ ३६ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी किरकोळ मार्केटमध्ये चनाडाळ १४० ते १६० रुपये किलो दराने विकली जाऊ लागली आहे. डाळी महागल्यामुळे दिवाळीपूर्वीच सामान्य नागरिकांचे दिवाळे निघाले आहे.
महागाई कमी करण्यासाठी शासनाने डाळींसह भाजीपाला एपीएमसीमधून वगळला. परंतु यामुळे बाजारभाव कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. डाळींचे दर वाढल्याने आॅगस्टपासून दिवाळीपर्यंत तूरडाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. पण सणाच्या काळात तूरडाळ नव्हे तर चनाडाळीचा अधिक वापर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. शासनाने गोदामांवर छापे मारून कारवाई केल्यासारखे भासविले. पण प्रत्यक्षात भाव कमी झालेच नाहीत. स्वस्त विक्री केंद्र उघडण्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत.
>पाच वर्षांत डाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर
शासनाने डाळी एपीएमसीमधून वगळल्यामुळे या व्यापारावर कोणाचेही नियंत्रण नाही. व्यापारी मोठ्या प्रमाणात डाळींची साठेबाजी करत असल्यामुळे सण, उत्सवांच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
डाळ २०१०एपीएमसी किरकोळ
चना ३० ते ४०११० ते १२४१४० ते १६०
तूर ३६ ते ४३८० ते ११५१२८ ते १४०
मूग २९ ते ३२६३ ते ७०१०० ते १२०
मसूर २९ ते ३०५९ ते ७०१००

Web Title: Due to costly pulses, before Diwali,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.