भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी
By Admin | Published: August 17, 2015 12:39 AM2015-08-17T00:39:14+5:302015-08-17T00:39:14+5:30
श्रावण मासारंभ तसेच स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सलग सुट्यांची पर्वणी साधत भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दी केली़ १५ आॅगस्ट, रविवार
शिर्डी : श्रावण मासारंभ तसेच स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सलग सुट्यांची पर्वणी साधत भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दी केली़ १५ आॅगस्ट, रविवार आणि मंगळवारी पतेती या सलग सुट्यांमुळे भाविक येथे दाखल झाले आहेत. शनिवारपासून सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी किमान तीन ते चार तास लागत आहेत. दर्शनरांगा संस्थान परिसरातून बाहेरील रस्त्यांपर्यंत शहराबाहेर जाऊन पोहोचल्या़ लाडू प्रसाद, उदी,भोजनालय येथेही मोठ्या रांगा लागल्या़ प्रशासनाने गर्दीमुळे व्हीआयपी पास सकाळपासूनच बंद ठेवले होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीस प्रमुख डॉ़ सौरभ त्रिपाठी यांनी आगामी सिंहस्थ काळातील गर्दी व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला़ (प्रतिनिधी)