दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 02:44 AM2017-09-18T02:44:41+5:302017-09-18T02:44:46+5:30

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.

Due to daily diets being neglected, Indians lack 'B12' vitamin | दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

Next

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.
‘बी१२’ या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून चेतापेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात येते. मेंदू, रोगप्रतिकारक क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व ‘बी१२’ची कमतरता असते. आश्चर्याची बाब म्हणजे लिंगआधारे केलेल्या विश्लेषणात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘बी१२’चा अभाव अधिक दिसून येतो आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला पूरक आहार घेत असल्याने त्यांचे शरीर ‘बी१२’ची पातळी राखते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील ‘बी१२’ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसेच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व ‘बी१२’ची कमतरता आणि संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.
‘जीवनसत्त्व बी १२’च्या अभावाची कारणे
अ‍ॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतं
गंभीर स्वरूपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होतात
क्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणा
वाढत्या वयासोबत जीवनसत्त्व ‘बी१२’ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वजन कमी करण्याची वा पोटाची शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन जाते. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अ‍ॅसिड कमी करणारे औषध घेत असल्यास हे जीवनसत्त्व शोषण्यास शरीराला अडथळे निर्माण होतात.
- डॉ. कीर्ती चढ्ढा
।शहर ‘बी१२’चा
अभाव
अहमदाबाद २७.९४
दिल्ली २६.५८
पुणे २२.६६
कोलकाता २०.७३
मुंबई १९.८४
कोचीन ९.१८

Web Title: Due to daily diets being neglected, Indians lack 'B12' vitamin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.