कोपर्डी घटनेतील पीडितेचे स्मारक होणे दुर्देवी: सुप्रिया सुळे

By admin | Published: July 13, 2017 04:12 PM2017-07-13T16:12:59+5:302017-07-13T16:12:59+5:30

कोपर्डी घटनेला एक वर्षे झाले तरी अद्याप अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घून हत्त्या करणा-यांंना नराधमांना शिक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले

Due to the death of Kopardi in the event of death, Supriya Sule | कोपर्डी घटनेतील पीडितेचे स्मारक होणे दुर्देवी: सुप्रिया सुळे

कोपर्डी घटनेतील पीडितेचे स्मारक होणे दुर्देवी: सुप्रिया सुळे

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - कोपर्डी घटनेला एक वर्षे झाले तरी अद्याप अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घून हत्त्या करणा-यांंना नराधमांना शिक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यात आता पीडीत मुलीच्या स्मारक होण्याची चर्चा सुरु आहे. ही अंत्यत दुदैवी बाब असल्याचे मत खासदरा सुप्रिया सुळे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मुक मोर्चानंतर व्यक्त केले.
 
कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात मुक मोर्चा चे आयोजन करण्यात आले.पुण्यात देखील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तोंडाला काळया पट्ट्या बांधून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की,राज्यात मागील तीन वर्षात महिलावरील अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.त्यात कोपर्डी घटनेत निष्पाप तरुणीचा बळी गेला आहे.त्यातील आरोपीना अजून शिक्षा होत नाही.ही अंत्यत दुदैवी बाब आहे.मात्र यावर हे सरकार काही करताना दिसत नसून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्री आहे.त्यांच्याकड़े पदाचा कार्यभार लक्षात घेता.राज्याला आर आर आबा सारख्या संवेदनशील गृहमंत्र्यांची गरज आहे.या मागणीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान  सत्तेत येण्यापूर्वी मराठा,धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कटिबध्द राहू.तसेच पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत विषय मंजूर करू असे सांगणारे भाजप मंत्री कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
मोर्चामध्ये पुणे जिल्हाराष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अर्चना घारे, मानसिंग पाचुंदकर, जितेंद्र इंगवले, अश्विनी खाडे उपस्थित होते

Web Title: Due to the death of Kopardi in the event of death, Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.