धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By admin | Published: February 9, 2017 06:33 PM2017-02-09T18:33:49+5:302017-02-09T18:33:49+5:30

ढालसावंगी येथे तलावातून पाणी उपसा करण्याच्या वादातून ८ फेब्रुवारी रोजी दुपारी एकाच समाजाच्या दोन गटांत हाणामारी झाली.

Due to the debate over the water from the dam, clashes in two groups | धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

Next

ऑनलाइन लोकमत
धाड (बुलडाणा), दि. 9 - ढालसावंगी येथे तलावातून पाणी उपसा करण्याच्या वादातून ८ फेब्रुवारी रोजी दुपारी एकाच समाजाच्या दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारी पोलिसात देण्यात आल्या आहेत.
ढालसावंगी शिवारातील भिलंदरी तलावात तुळजाभवानी बहुउद्देशीय मासेमारी संस्थेतील सदस्यांनी रितसर परवाना पावती भरून तलावात मत्स्यबीज टाकले आहे. या तलावातून पाणी उपसा करण्यात येत आहे.

सध्या पाण्याची स्थिती पाहता मत्स्यबीज वाढण्याच्या हेतूने मासेमारी संस्थेतील सदस्यांनी मदन साळुबा वाघ आणि १० जणांना तलावातून मोटार पंप टाकून पाणी उपसा करताना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेल्या हाणामारीत बंडू वाघ, सदाशिव वाघ हे दोघे जखमी झाले.

Web Title: Due to the debate over the water from the dam, clashes in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.