उत्पादन घटल्याने टोमॅटो कडाडला, भाव गेला ८० पार!

By admin | Published: June 3, 2016 03:44 AM2016-06-03T03:44:09+5:302016-06-03T03:44:09+5:30

दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात

Due to the decline in the production of tomato, the price went up 80! | उत्पादन घटल्याने टोमॅटो कडाडला, भाव गेला ८० पार!

उत्पादन घटल्याने टोमॅटो कडाडला, भाव गेला ८० पार!

Next

नवी मुंबई /सातारा : दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात तब्बल ८० रुपयांच्या पुढे गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बागायती टप्प्यात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले
जाते. हाच टोमॅटो मुंबई आणि पुण्याच्या घाऊक बाजारात जातो, परंतु गेल्या वर्षी
पुरेसा पाऊस न झाल्याने सह्याद्रीच्या
पश्चिम घाटातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे धरणांच्या पायथ्याशी असणाऱ्या बागायत शेतीसाठी पाणी पूर्णत: बंद केले गेल्याने, फळभाज्यांची लागवडच शेतकऱ्यांना थांबवावी लागली. याचा सर्वाधिक विपरित परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर झाला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढू लागले आहेत. मार्केटमध्ये ३० ते ३५ ट्रक टेम्पोमधून सुमारे १४०० क्विंटलची आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी हीच आवक तिप्पट होती. आवक कमी असल्याने घाऊक बाजारातील दर ४० ते ४५ रुपये किलो झाला असून, किरकोळ बाजारातमध्ये टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
पाण्याअभावी बागायतदारांना कोणतेच पीक घेता येईनासे झाले आहे. टोमॅटोला
दर आठवड्याला एक वेळा पाणी द्यावे
लागते. धरणांमध्ये तर पाणी नाही, तसेच वारंवार वीजकपातही होत असते. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली, तर अनेक शेतकऱ्यांना केलेली लागवड
काढून टाकावी लागली, अशी व्यथा धनकडेवाडीचे (ता. वाई) शेतकरी सुरेश पवार यांनी मांडली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

प्रमुख बाजारपेठांतील टोमॅटोचे होलसेल भाव
शहरबाजारभाव आवक
मुंबई४० ते ४५१४००
सातारा४० ते ४५६९
पुणे१५ ते ४२८९०
कोल्हापूर१० ते ५०९१६
संगमनेर१० ते ४५१२५००
जुन्नर ६.५० ते ८.५०१६२६०

Web Title: Due to the decline in the production of tomato, the price went up 80!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.