पोलिसांच्या दिरंगाईमुळे अंतरा दासच्या मारेक-याला जामीन

By Admin | Published: March 31, 2017 09:42 AM2017-03-31T09:42:09+5:302017-03-31T09:44:55+5:30

पोलिसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे अभियंता अंतरा दास हिच्या मारेक-याला जामीन मंजूर झाला आहे.

Due to the delay in the police, bail to Anta Das | पोलिसांच्या दिरंगाईमुळे अंतरा दासच्या मारेक-याला जामीन

पोलिसांच्या दिरंगाईमुळे अंतरा दासच्या मारेक-याला जामीन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पिंपरी चिंचवड, दि. 31 -  पोलिसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे महिला अभियंता अंतरा दास हत्या प्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजूर झाला आहे. 90 दिवस उलटलेल असतानाही आरोपपत्र दाखल न झाल्याने कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर करत पोलिसांना खडसावलं.
याप्रकरणी कोर्टाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नार्को टेस्टची तारीख न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे उत्तर पोलिसांनी कोर्टात दिलं.
 
काय आहे नेमकी घटना ?
कॅपजेमिनी कंपनीतील महिला अभियंता अंतरा दासची डिसेंबर 2016 मध्ये हत्या झाली होती. तळवडे एमआयडीसी परिसरात भर रस्त्यात रात्री तिची धारदार शस्त्राने भोसकडून हत्या करण्यात आली.  याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरुतून अटक करण्यात आली होती. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरुमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होता.
 
अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हा पासून तो  तिच्या संपर्क होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच त्याने अंतराला लग्नाची मागणीही घातली होती.  मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक "ब्लॉक" केला होता. तसेच अंतरा पुण्यात कुणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते.
 
अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा 23 डिसेंबर रोजी रात्री तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र सिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. 

आरोपीच्या नार्को टेस्टची मागणी
सुरुवातीला देहू रोड पोलीस या हत्या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र नंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आता नार्को टेस्टसाठी एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळ मिळणार आहे, अशी माहिती आहे.
 

Web Title: Due to the delay in the police, bail to Anta Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.