मुंबई विमानतळावर विमानाचा टायर फुटल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट
By admin | Published: March 16, 2016 08:52 AM2016-03-16T08:52:35+5:302016-03-16T11:06:08+5:30
एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अचानक विमानाचा टायर फुटला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अचानक विमानाचा टायर फुटला. त्यामुळे काहीवेळासाठी प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. नागपूरहून आलेले एअर इंडियाचे एआय६३० एअरबस-३२० विमान लँण्ड केल्यानंतर धावपट्टीवरुन चालत असताना अचानक विमानाचा टायर फुटला.
त्यामुळे विमानातील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. टायर फुटून निर्माण झालेली आग प्रवासी खिडकीपर्यंत आल्याने गोंधळ उडाला असे एका प्रवाशांने सांगितले. विमानातील क्रू मेंबर्सनी तात्काळ इर्मजन्सी च्युटसमधून प्रवाशांना खाली उतरवले. यावेळी काही प्रवाशांना उतरताना किरकोळ दुखापत झाली.
विमानामध्ये १५० प्रवासी होते. रात्रीच्या दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर काहीवेळासाठी हवाई वाहतूक बंद होती असे सूत्रांनी सांगितले.
#Visuals of the Air India flight whose burst last night at Mumbai airport during landing. pic.twitter.com/oMWRjmJrna
— ANI (@ANI_news) March 16, 2016
During landing the plane tyre burst, fire gradually came towards the window. There was a lot of panic-Passenger pic.twitter.com/up6HPxdsfk
— ANI (@ANI_news) March 16, 2016
Air India flight tyre burst last night at Mumbai airport (In pic: tyre that burst during landing) pic.twitter.com/CPa0ide9PO
— ANI (@ANI_news) March 16, 2016