पशुधनालाही दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2015 01:05 AM2015-07-18T01:05:48+5:302015-07-18T06:04:54+5:30

मराठवाड्यातील दुष्काळझळांचा फटका पशुधनालाही बसत आहे. विभागात सध्या ५५ लाखांच्या आसपास लहान-मोठे जनावरे आहेत. एवढ्या मोठ्या तोंडांना दररोज अंदाजे ५ ते ६ लाख टन चारा लागतो.

Due to drought in the cattle | पशुधनालाही दुष्काळाच्या झळा

पशुधनालाही दुष्काळाच्या झळा

Next

-विकास राऊत,  औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळझळांचा फटका पशुधनालाही बसत आहे. विभागात सध्या ५५ लाखांच्या आसपास लहान-मोठे जनावरे आहेत. एवढ्या मोठ्या तोंडांना दररोज अंदाजे ५ ते ६ लाख टन चारा लागतो. सध्या या जनावरांचे पोट भरत आहे, मात्र पाऊस लांबला तर त्यांना विचविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
मराठवाड्याची अवस्था सध्या वैराण वाळवंटाप्रमाणे झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण, कोरडे पडलेले प्रकल्प, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.
विभागात सध्या तरी चाराटंचाई नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी अजून नियोजन केलेले नाही; परंतु पाऊस लांबला तर अडचण येऊ शकते. चाऱ्यासाठी छावण्यांचे नियोजन करण्याचे आदेश आहेत. विभागातील यंत्रणेकडून चालू वर्षातील पशुधनाच्या माहितीचा अहवाल मागविण्यात येत आहे, असे महसूल उपआयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

आठ जिल्ह्यांतील जनावरांची संख्या...

जिल्हालहान मोठी एकूण
औरंगाबाद१,२४,९७८५,५०,७२४६,७५,७०२
जालना १,४१,८७२४,७३,९०७५,१५,७७९
परभणी८४,७३२ ३,६१,९३२ ४,४६,६६४
हिंगोली ६०,६८२३,०३,२१३,६३,८९२
नांदेड २,०३,०२५६,८६,०९०८,८९,११५
बीड१,५७,१६६६,६८,२६८८,२५,४३४
लातूर१,४४,९३२४,५५,२१४६,००,१४६
उस्मानाबाद१,१३,७९१४,१२,४१४५,२६,२०५
एकूण १०,३१,१७८९,११,७५९  ४९,४२,९३७

 

 

Web Title: Due to drought in the cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.