दुष्काळ निधी टंचाईसाठी खुला

By admin | Published: June 28, 2014 01:04 AM2014-06-28T01:04:08+5:302014-06-28T01:04:08+5:30

अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

Due to the drought crisis, it is open for scarcity | दुष्काळ निधी टंचाईसाठी खुला

दुष्काळ निधी टंचाईसाठी खुला

Next
>मुंबई : जीवघेणी प्रतीक्षा करायला लावणारा पावसाळा व राज्यभरातील पाण्याचा अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडून आल्यास त्यासाठी मुख्यमंत्री दुष्काळ  सहायता निधीमधून आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले. 
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानातून तीन विभागीय आयुक्त (नाशिक, पुणो, औरंगाबाद) तसेच या तीन विभागातील 2क् जिल्हाधिका:यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात पाऊस लांबल्यामुळे या विभागात काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील याबाबत मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला. 
राज्यातील पाणीस्थिती बघता मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील दोन कोटींर्पयतचा निधी खर्च करण्याची 3क् जूनला संपणारी मुदत वाढवून देण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले. राज्यातील उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिका:यांना दिल्या. या वेळी मुख्य सचिव जे.एस. सहारीया, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, लाभक्षेत्रविकास विभाग प्रधान सचिव मालिनी शंकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधानसचिव राजेशकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा योजना, सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी आवश्यक तो निधी प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येईल. यासाठी तातडीने तसे प्रस्ताव तयार करून मुख्य सचिवांकडे सादर करावेत. राज्यातील शिल्लक पाणीसाठय़ाचा वापरात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. तसेच धरणातील पाणी जिल्हाधिका:यांच्या परवानगीशिवाय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)
 
अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणी
च्मुख्यमंत्री म्हणाले की, पाऊस न पडल्याने अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणी करावी लागेल, तसेच अनेक गावांना टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणो आवश्यक आहे. पाऊस न पडल्यास चा:याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्याचा आपत्कालीन आराखडा तयार करावा. अजून काही दिवस पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी अधिक टँकर्स मागवावे लागतील, यासाठीचे नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. 
च्लागोपाठ दोन वर्ष महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे.  त्यामुळे दुष्काळ निवारण्याचा आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच औरंगाबाद विभागाची स्वतंत्र बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या जिल्ह्यांमध्ये मागील दोन वर्षात गाळ काढण्याचे, सिमेंट साखळी बंधा:याचे काम पूर्ण झाले आहे, त्याचे डॉक्युमेंटेशन करावे, अशा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.   

Web Title: Due to the drought crisis, it is open for scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.