दारणा नदीपात्रात बुडून दोघा अल्पवयीनांचा मृत्यू

By admin | Published: May 15, 2016 05:47 PM2016-05-15T17:47:14+5:302016-05-15T17:47:14+5:30

म्हशींना पाणी पाजण्यासाठी दारणानदीपात्रात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़

Due to drought in the Darna river, the death of two minors | दारणा नदीपात्रात बुडून दोघा अल्पवयीनांचा मृत्यू

दारणा नदीपात्रात बुडून दोघा अल्पवयीनांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १५ : म्हशींना पाणी पाजण्यासाठी दारणानदीपात्रात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ या घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे ईश्वर बाळासाहेब शिंदे (११) व समाधान प्रकाश शिंदे (१०) अशी असून ते भगूर येथील रहिवासी आहेत़ नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही अल्पवयीन मुले म्हशींना पाणी पाजण्यासाठी दारणा नदीपात्रात गेले होते़ या ठिकाणी म्हशी पाण्याबाहेर निघत नसल्याने हे दोघेही पाण्यात उतरले असता या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला़ या दोघांचेही मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Due to drought in the Darna river, the death of two minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.