दुष्काळामुळे महाराष्ट्रातील वीज निर्मितीला मोठा फटका
By admin | Published: July 29, 2016 01:39 AM2016-07-29T01:39:01+5:302016-07-29T01:39:01+5:30
दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी ही केंद्रे बंद करावी लागली आहेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
परळी वीज निर्मिती केंद्रातील सर्व पाचही संच दुष्काळामुळे बंद करावे लागले आहेत. ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान २२८६ मेगावॅट क्षमतेच्या परळी (१३८०), मिहान (२४६), जीईपीएल (१२०), नाशिक टीपीएस (२७०) आणि बेला (२७०) केंद्रे बंद करावी लागली आहेत. परळी आणि मिहान केंद्र कमी पाणी असल्यामुळे बंद करावे लागले. दुष्काळामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्यावर विचार केला जात आहे. टॅरीफ धोरणानुसार २०१६ मध्ये ५० किलोमीटर क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या पाण्याचा वापर अपरिहार्य करण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.