तमाशापंढरीवर दुष्काळाचे सावट
By admin | Published: March 7, 2016 02:03 AM2016-03-07T02:03:26+5:302016-03-07T02:03:26+5:30
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव तमाशा पंढरीत २७ राहुट्यांनी सजले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गाव पुढाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे
बुकिंगवर परिणाम : सुपाऱ्या मिळण्याचे प्रमाण घटले
नारायणगाव : महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव तमाशा पंढरीत २७ राहुट्यांनी सजले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गाव पुढाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे. या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचे सावट लोकनाट्य तमाशा खेळाच्या बुकिंगवर होणार असल्याने तमाशा फड मालक चिंताग्रस्त आहेत.
लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीत तमाशाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गावातील ग्रामस्थ यांची रेलचेल सुरू झाली आहे.
यंदाच्या वर्षी तमाशा पंढरीत मंगला बनसोडे करवंडीकर, अंजली नाशिककर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर , हरिभाऊ बढे नगरकर, मालती इनामदार, संभाजी जाधव संक्रापूरकर सह शांताबाई जाधव संक्रापूरकर, संध्या माने सोलापूरकर, लता पुणेकर आनंद लोकनाट्य जळगावकर, मास्टर जगन वेळवंडकर व हौसा वेळवंडकर, दत्ता महाडिक पुणेकर, बाळ आल्हाट नेतवडकर, भिका-भीमा सांगवीकर , सर्जेराव जाधव हावडीकर, नंदाराणी बोकटे, वामनराव पाटोळे मेढापूरकर, मनीषा सिद्धटेककर,आदिला औरंगाबादकर, छाया खिल्लारे बारामतीकर, ईश्वरबापू पिंपरीकर, काळू नामू वेळवंडकर, संगीता महाडिक पुणेकर, प्रकाश आहिरेकर सोबत नीलेशकुमार आहिरेकर, लता पुणेकर, किसन साळवे अहमदाबादकर, लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या या तमाशा पंढरीत उभारल्या आहेत़ तर, काळू-बाळू आणि पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशा राहुट्या लवकरच लागणार आहेत, अशी माहिती नारायणगाव लोकनाट्य तमाशा कलापंढरीचे अध्यक्ष गणपतदादा कोकणे व अन्वरभाई पटेल यांनी दिली़.
(वार्ताहर)